सुशांत आत्महतत्या प्रकरण : सुप्रिम कोर्टानं मुंबई पोलिसांकडे ३ दिवसात मागितला चौकशी अहवाल

सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुशांत आत्महतत्या प्रकरण : सुप्रिम कोर्टानं मुंबई पोलिसांकडे ३ दिवसात मागितला चौकशी अहवाल
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारनं या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारनं बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI कडे दिली जाण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल.

सुशांत सिंह यांच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्यात बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी कायम ठेवण्याचीही कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. कोर्टानं दोन्ही पक्षांचं म्हणनं नोंदवून घेतलं आहे. याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करणार की CBI याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण! तपास सीबीआयला द्यावा बिहार सरकारने केंद्र सरकारला लिहिले पत्र

सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने

संबंधित विषय