सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने

बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस एकत्र काम करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र वस्तूस्थिती पाहता दोघंही एकमेकांना पाण्यात बघत असल्याचे निदर्शनास येते.

सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने
SHARES

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून सध्या मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. या प्रकरणात बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस एकत्र काम करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र वस्तूस्थिती पाहता दोघंही एकमेकांना पाण्यात बघत असल्याचे निदर्शनास येते.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिसांचा तपास ठप्प, ‘ते’ ४ अधिकाऱीही क्वारंटाईन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सोमवारी पहिल्यांदाच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी सिलेक्टिव पत्रकारांना बोलवतं, सुशांत आत्महत्येविषयी माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. त्यावरून एकच वादंग निर्माण झाले. बिहार पोलीस करत असलेल्या तपासावरुन मुंबई पोलीस आयुक्तांना विचारणा केली असता ते म्हणाले की, "बिहार पोलिसांनी आमच्याशी संपर्क केला होता, मात्र ते त्यांच्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन चौकशी करत आहेत. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. बिहार पोलिसांना एफआयआरची नोंद करायला हवी होती. आम्हाला माहिती नाही कुठल्या कायद्यांतर्गत बिहार पोलीस एक्स्ट्रा टेरिटोरियल तपास करत आहेत. ज्याप्रकारे कायदेशीर सल्ला मिळेल त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करु. त्यामुळे आम्ही अजून कुठलेही कागदपत्रे बिहार पोलिसांना दिलेले नाहीत. अजूनही तपासाचे सर्व अधिकार स्थानिक पोलिसांनाच आहेत. त्यांनी आम्हाला केस ट्रान्सफर करायला हवी होती. मात्र आमचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंहच्या वडिलांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

तर दुसरीकडे बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना. मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र ते तसे न करताना दिसत नाहीत. याबाबत मी स्वतः महाराष्ट्र पोलिस महासंचालक सुबोध कुमार जैयस्वाल आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांना फोन करून तसेच मेसेज करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही प्रतिउत्तर आलेले नाही. मुंबई पोलिस सुशांत आत्महत्या प्रकरणाचे कोणतेही कागदपत्र देत नाही आहेत. तसेच ज्या ठिकाणी बिहार पोलिस तपासाला जात आहेत. त्यांच्या तपासात अडथळे निर्माण करत आहेत. मुंबई पोलिस तर सध्या रिया चक्रवर्तीची भाषा बोलत आहेत. तिलाही बिहार पोलिस करत असलेला तपास नको आहे. या प्रकरणाचा तपास  योग्य रित्या व्हावा ही आमची मानसिकता आहे. मग तो बिहार पोलिसांनी  करावा. किंवा सीबीआयने मात्र तेही त्यांना मान्य नाही. मुंबईत बिहार पोलिसांना एका आरोपीप्रमाणे मुंबईचे पोलिस गाडीत बसवून नेत आहेत. एका आयपीएस अधिकाऱ्याला काल मिळालेली वागणूक संबध भारताने प्रसार माध्यमांद्वारे पाहिली आहे. त्यांना ज्या प्रकारे रात्री ११ वा. जबरदस्ती क्वारनटाईन करण्यात आले. त्यावरून सुशांत आत्महत्या प्रकरणात तपासापासून बिहार पोलिसांना लांब ठेवण्यासाठी जाणून बुजून अडथळा निर्माण केला जात असल्याचे स्पष्ठ दिसत असल्याचा आऱोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.   

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा