Advertisement

मुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

मुनगंटीवार आणि शिकाऱ्यामध्ये साटंलोटं असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता. या आरोपामुळे नाराज झालेल्या मुनगंटीवार यांनी निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.

मुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा
SHARES

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाघ मारण्यात अधिक रस आहे. एवढंच नाही, तर त्यांच्यात आणि शिकाऱ्यामध्ये साटंलोटं असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता. या आरोपामुळे नाराज झालेल्या मुनगंटीवार यांनी निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.


काय म्हणाले निरूपम?

मुनगंटीवार जेव्हापासून वनमंत्री झालेत, तेव्हापासून वाघांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात २००८ ते २०१५ या काळात केवळ १४ वाघ मारण्यात आले होते. मात्र, २०१६ या अवघ्या वर्षभरात १६ वाघ मारण्यात आले. २०१७ मध्ये २१ वाघांची शिकार करण्यात आली. मुनगंटीवार यांना प्राणी मारण्यात अधिक रस अाहे.


मोर्चाचं आयोजन

त्यामुळेच शिकारी माफियांवर कुठलीही कारवाई करण्यात होत नाही. कारण मुनगंटीवार आणि शिकाऱ्यामध्ये साटंलोटं आहे. असा आरोप करत मुनगंटीवारांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्याची मागणी निरूपम यांनी केली. सोबतच अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ ११ नोव्हेंबर २०१८ रोजी वरळी सीफेस ते शिवाजी पार्क असा मोर्चा काढण्यात येईल, असंही ते म्हणाले.

निरूपम यांच्या आरोपांनी व्यथीत झालेल्या मुनगंटीवार यांनी निरूपम यांच्या बेताल वक्तव्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं स्पष्ट केलं.


न्यायालयीन चौकशीची मागणी

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेदेखील अवनी प्रकरणावरून मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुनगंटीवार स्वत: बंदूक घेऊन अवनीची शिकार करायला गेले नव्हते, असं म्हणत काहीजण मुनगंटीवार यांचा पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. असं असेल, तर पंतप्रधान मोदी काय बंदूक घेऊन सर्जिकल स्ट्राइक करायला गेले होते का? असा खोचक प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या शिकारीची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.



हेही वाचा-

अधिवेशनात गाजणार अवनी वाघिणीचा मुद्दा; शिवसेना आक्रमक

...तर सरकारवरही गोळ्या झाडायच्या का - संजय राऊत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा