कुरार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण


कुरार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण
SHARES
देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या 469 वर पोहचली आहे. या कोरोनाचा हा संसर्ग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहचला आहे.   कुरार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला  कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याची कोरोनाची टेस्ट पाँझिटीव्ह आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या आता इतर  पोलिस कर्मचाऱ्यांची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.

 उत्तर मुंबईत कायम नागरिकांच्या गर्दीने व्यापलेले पोलिस ठाणे  म्हणून कुरार पोलिस ठाण्याची ओळख आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा बहुतांश भाग हा झोपडपट्टी परिसर आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात कायमच वर्दळ असते. मुंबईत सध्या कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातल्यामुळे संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, नागरिकांच्या सुरक्षेस असलेल्या नर्स, डाँक्टर आणि पोलिसांना या रोगाने आता जखडण्यास सुरूवात केली आहे.


मुंबई पोलिस दलातील वरळी पोलिस कँम्पआणि रेल्वे पोलिस दलातील कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागन झाल्याची घटना ताजी असतानाच, आज कुरार पोलिस ठाण्यात एका पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. अचानक पोलिस कर्मचाऱ्याला थकवा आणि अस्वस्थ वाटू लागल्याने तो तपासणीसाठी गेला. त्यावेळी त्याला लागन झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यातील त्या अधिकाऱ्यांचा वास्तव्याची खोली सील केली आहे. तर परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. माञ या घटनेनंतर त्या पोलिस कर्मचाऱ्यांसोबत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
 त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांची कोरोनाची लागण झाली आहे का?  हे आता तपासले जाणार आहे. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा