Advertisement

IPL 2020 अनिश्चित काळासाठी पुढे, बीसीसीआयचा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा झाली असून, या चर्चेत आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

IPL 2020 अनिश्चित काळासाठी पुढे, बीसीसीआयचा निर्णय
SHARES
Advertisement

यंदाची इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पुढे ढकलण्यात आली होती. आयपीएल उशीरानं एप्रिलमध्ये होणार असल्याची चर्चा होती. परंतु, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन २१ दिवसांनी वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आलं आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा झाली असून, या चर्चेत आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ हजारांहून अधिक झाला आहे. त्यापैकी ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३६२ जणं बरे झाले आहेत.

बीसीसीआयनं आयोजीत केलेल्या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ आणि आयपीएल सीओओ हेमांग आमीन उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयनं सर्व फँचायझी, भागदारक आणि ब्रॉडकास्टर यांना आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. रद्द केलेली नाही, असे समजावलं आहे.

यंदा दुसऱ्यांदा आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी २९ मार्चला सुरू होणारी आयपीएल १४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली होती. आयपीएल २०२० साठी बीसीसीआयनं अनेक पर्यायांचा विचार केला होता. त्यांनी ही स्पर्धा बंद स्टेडियमवर खेळवण्याचाची पर्यायाचा विचार केला. आता आयपीएलसाठी सप्टेंबर आणि नोव्हेंबरचा पर्याय आहे.

संबंधित विषय
Advertisement