Advertisement

Ganeshotsav 2020: कोरोनामुळं ग्राहकांची सजावटीच्या सामानाच्या खरेदीकडे पाठ

यंदा गणेशोत्सव साधेपणानं व नियमांखाली साजरा करावा लागणार आहे.

Ganeshotsav 2020: कोरोनामुळं ग्राहकांची सजावटीच्या सामानाच्या खरेदीकडे पाठ
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं यंदा सर्वच सण साधेपणानं साजरे केले जात आहेत. सध्या गणेशोत्सव तोंडावर आला असून मुंबईची बाजारपेठ थंड पडली आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणानं व नियमांखाली साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राचा फटका गणेशोत्सवानिमित्त सजावट, रोषणाई आदी साहित्यविक्री करणाऱ्या बाजारपेठेला बसला आहे.

गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या विद्युतमाळा, कृत्रिम फुलांचे सजावट साहित्य यांना जोरदार मागणी असते. मात्र, यंदा मुंबईसह ठाणे आणि पुण्यात विक्रेते नवे साहित्य मागवण्याऐवजी आपल्याकडील आधीच्याच शिल्लक वस्तूंची विक्री करीत आहेत. यंदा विक्रीत मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे.

यंदा लोहार चाळीतील इलेक्ट्रिक साहित्याचा बाजार ग्राहकांविना ओस पडला आहे. कृत्रिम फुले, तोरणे, शोभेच्या प्लास्टिक वस्तू, त्याचबरोबर रंगीबेरंगी विद्युतमाळा, प्रकाशझोत फेकणारे फिरते दिवे आदी साहित्यच बाजारात दिसेनासे झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवाची खरेदी पंधरा दिवस आधीच होते. यंदाच्या उत्सवावर करोनाचे सावट असल्याने बाजारात खरेदीसाठी फारशी गर्दी नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील ५ महिन्यांपासून ठप्प असलेल्या बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळं हालचाल दिसू लागली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानं होत असला, तरी घरगुती गणपतीच्या सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. विद्युत साहित्य विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी होत आहे. 



हेही वाचा -

मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय

बेस्टच्या आतापर्यंत 'इतक्या' कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा