Advertisement

मुंबईच्या तलावांत ९३.७४% जलसाठा; पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता

सध्यस्थितीत ७ ही तलावांत एकूण ९३.७४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

मुंबईच्या तलावांत ९३.७४% जलसाठा; पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता
SHARES

मुंबईसह उपनगरात ऑगस्ट महिन्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसाची संततधारा सुरू असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत. सध्यस्थितीत ७ ही तलावांत एकूण ९३.७४ टक्के जलसाठा असून, तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे ४ तलाव केव्हाच ओव्हर फ्लो झाले आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात गेले काही दिवस दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरत आहेत. तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे ४ तलाव केव्हाच ओव्हर फ्लो झाले असून, आता केवळ अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे तीनच तलाव भरणं शिल्लक आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. काही दिवसांपूर्वी जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्यानं ५ ऑगस्टपासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्यानं तलावांतील जलसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

महापालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून हा बदल लागू झाला आहे.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू

आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांतRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा