Advertisement

मुंबईत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात ६९० जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १० हजार ५९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने २५८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात ९९१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३६ रुग्ण दगावले आहेत. तर २१ आॅगस्ट रोजी ४२ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २२ आॅगस्ट रोजी एकूण ३२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे ९९१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३६ हजार ३४८ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ६९० जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १० हजार ५९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १० हजार ४४१ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ७१  हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,४४१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा