Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो

हळूहळू तलाव भरत असल्यानं मुंबईकरांवर पाणी टंचाईची शक्यता लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो
SHARES

यंदा पावसानं ऑगस्ट महिन्यात चांगली हजेरी लावल्यानं मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांत मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो झाला, तर गुरूवारी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला. हळूहळू तलाव भरत असल्यानं मुंबईकरांवर पाणी टंचाईची शक्यता लवकरच मिटण्याची शक्यता आहे. अशातच महापालिकेनं शुक्रवारपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी तानसा तलाव गुरूवारी संध्याकाळी ७.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. हा तलाव गतवर्षी २५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधी वर्ष २०१८ मध्‍ये १७ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्‍ये १८ जुलै रोजी तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच सन २०१६ मध्‍ये हा तलाव २ ऑगस्‍ट रोजी भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत ७ ही तलावातील जलसाठा हा १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर्स इतका असून, तो क्षमतेच्‍या ८७.२० टक्‍के एवढा आहे.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाची संततधारा सुरू आहे. गणपती बाप्पाचं आगमन ही पावसात होत आहे. 



हेही वाचा -

मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता

गणपती विसर्जनासाठी मुंबईत ३०० कृत्रिम तलाव



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा