Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'हे' तलावही ओव्हरफ्लो

सततच्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात वाढ होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'हे' तलावही ओव्हरफ्लो
SHARES

मुंबईत जून, जुलै महिन्यात पावसानं पुरेशी हजेरी न लावल्यानं मुंबईकरांवर पाणीटंचाईची सावट आलं. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसानं तुफान बॅटींग केली आहे. सततच्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात वाढ होत आहे. मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसंच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

गतवर्षी हा तलाव २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी २०१८ ला १५ जुलैला रोजी हे तलाव ओव्हरफ्लो झालं होतं. मात्र, यंदा जून, जुलै या दोन्ही महिन्यात पावसानं फार कमी हजेरी लावली. त्यामुळं अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. सुदैवाने ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच पावसानं जोर धरला आहे. त्यामुळं मुंबईतील ७ तलावांपैकी ३ तलाव भरले आहेत.

मुसळधार पावसामुळं मोडक सागर धरण भरलं आहे. याआधी तुळशी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळं मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट लवकरच टळणार असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या ८२.९५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.



हेही वाचा -

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा