Advertisement

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद

यंदा भक्तांना आपल्या बाप्पाला चौपाटीवर निरोप देता येणार नाही.

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबईत बाप्पाचं आगमन धुमधडाक्यात केलं जातं. मुंबईच्या गणेशोत्सवाची जगभरात एक वेगळीच ओळख बनली आहे. विशेष म्हणजे परदेशातून अनेक जण बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी मुंबईच्या चौपाट्यांवर येत असतात. या ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होते. तसंच, गणेशभक्त ही बाप्पाला आदराने निरोप देतात. परंतु, या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आलं आहे. त्यामुळं यंदा वाजत-गाजत ना आगमन होणार... ना विसर्जन. त्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच यंदाचा गणेशोत्सवहा नियमांच्या अटीखाली साजरा करायचा असताना विसर्जनही साध्या पद्धतीनं करावं लागणार आहे. यंदा भक्तांना आपल्या बाप्पाला चौपाटीवर निरोप देता येणार नाही.

गिरगाव चौपाटीपाठोपाठ तुलनेत लहान असलेल्या दादर आणि माहीमच्या चौपाट्यांवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लगतच्या रस्त्यांवर लोखंडी मार्ग रोधक उभारून चौपाटीवर जाणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. परिणामी भाविकांना घरी, सोसायटीच्या आवारात अथवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावं लागणार आहे. 

समुद्रावर येणाऱ्या भाविकांना विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. गिरगावप्रमाणं दादर, माहीम चौपाटीवरही दरवर्षी गणेश विसर्जना निमित्तानं भाविकांची गर्दी होते. गेल्या वर्षी येथे सुमारे २० हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. दरवर्षी दादर आणि माहीम चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येत असले तरी यंदा मात्र भाविकांना तेथे प्रवेश मनाई करण्यात आली आहे.

चौपाटीवर जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी मार्गरोधक उभारण्यात येणार आहे. चौपाटीवर येणाऱ्या भाविकांना गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात देऊन परतावे लागणार आहे. महापालिकेमार्फत गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेता भाविकांनी घरी किंवा सोसायटीच्या आवारात गणेश विसर्जन करावे. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे. पालिकेतर्फे फिरत्या कृत्रिम तलावाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. हेही वाचा -

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीला डिमांड, 'या' चौपाटीला अधिक प्राधान्य

फिलीपाइन्स वापरणार धारावी पॅटर्न! महापालिकेने दिली ब्ल्यू प्रिंटRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा