Advertisement

फिलीपाइन्स वापरणार धारावी पॅटर्न! महापालिकेने दिली ब्ल्यू प्रिंट

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुंबईतील धारावी पॅटर्नचं कौतुक केल्यानंतर आता आंतराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला हा पॅटर्न फिलीपाइन्स या देशात सुद्धा वापरण्यात येणार आहे.

फिलीपाइन्स वापरणार धारावी पॅटर्न! महापालिकेने दिली ब्ल्यू प्रिंट
SHARES

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुंबईतील धारावी पॅटर्नचं कौतुक केल्यानंतर आता आंतराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला हा पॅटर्न फिलीपाइन्स या देशात सुद्धा वापरण्यात येणार आहे. यासंदर्भात फिलपाइन्स सरकारकडून मुंबई महापालिकेशी संपर्क साधण्यात आल्याचं समजत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Philippines will use dharavi pattern of bmc to control covid 19)

कोरोना रोखण्यासाठी धारावी पॅटर्न अत्यंत परिणामकारक असून आमच्या येथील दाटीवाटीच्या परिसरात हा पॅटर्न प्रभावीपणे राबवता येऊ शकतो, असं फिलिपाइन्सच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटल्याचं वृत्त फिलिपाइन्सच्या 'इनक्वायरर' या संकेतस्थळाने दिलं आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे. धारावीत कोरोनाचा शिरकाव होताच अल्पावधीतच धारावी कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनली. त्यानंतर मुंबई महापालिकेने आपलं संपूर्ण लक्ष धारावीकडे केंद्रीत केलं. ‘चेस द व्हायरस’ उपक्रमाअंतर्गत ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली. प्रो ॲक्टिव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर्स  यामुळे येथील साथ नियंत्रणात ठेवता आली. १४ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांचं विलगीकरण करण्यात आलं. उच्च जोखमीचे झोन निश्चित करून खासगी डाॅक्टरांची मदत घेण्यात आली. कंटेन्मेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्य पुरवण्यात आलं.

हेही वाचा - Coronavirus In Dharavi: म्हणून धारावीचं कौतुक करावं तेवढं कमीच

खडतर परिश्रमानंतर धारावीतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी होऊ लागली. सध्या कोरोनाची लक्षणे असलेले धारावीतील ५३८८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील रुग्ण दुपटीचा दर ८६ दिवसांवर आला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ८१ टक्के आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटली असून हा दर ४.८ इतका झाला आहे. 

फिलिपाइन्स सरकारलाही धारावी पॅटर्न लागू करायचा आहे. आम्ही त्यांना धारावीच्या या पॅटर्नची ब्ल्यूप्रिंट दिली आहे, अशी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

धारावी पॅटर्नची दखल अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनंही घेतली होती. वॉशिंग्टन पोस्टने मुंबई महापालिकेचं कौतुकही केलं होतं.

हेही वाचा - Covid-19 In Dharavi: धारावीत कोरोनावर यश संघ स्वयंसेवकांमुळेच? हा जरा अतिरेकच- शिवसेना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा