Advertisement

कोविड सेंटरच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही, महापौरांनी फेटाळले मनसेचे आरोप

कोविड सेंटर उभारणीच्या कामात स्वत:च्या मुलाला कंत्राट मिळवून दिल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

कोविड सेंटरच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही, महापौरांनी फेटाळले मनसेचे आरोप
SHARES

कोविड सेंटर उभारणीच्या कामात स्वत:च्या मुलाला कंत्राट मिळवून दिल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. कोरोनाच्या काळात बोंबा मारायला मिळाल्या नाहीत, म्हणून मनसे आरोप करत असल्याचंही महापौर म्हणाल्या. (mumbai mayor kishori pednekar denies allegations made by mns regarding corruption in covid center)

मुंबईतील कोविड सेंटर उभारण्याचं काम अनेक कंपन्यांनी केलं असून त्यात माझ्या मुलाचीही एक कंपनी आहे. माझा मुलगा सज्ञान आहे. गेली १० वर्षे तो व्यवसाय करत आहे. काम मिळविणं हा त्याचा हक्क आहे. त्याच्या कंपनीने बेकायदेशीररित्या कंत्राट मिळवल्याचा कुणाला संशय असेल, तर त्यांनी महापालिकेत जाऊन चौकशी करावी, असं आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेला दिलं. 

हेही वाचा - महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिलं कोविड सेंटरचं काम, मनसेचा आरोप

ही कसली पोटदुखी आहे? कोरोनाकाळात बोंबा मारायला मिळाल्या नाहीत. मुंबई महापालिका चांगलं काम करत कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. हे काही जणांना बघवत नसल्यानेच काहीतरी आरोप उकरून काढण्याचं काम सुरू असल्याचंही महापौर म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन महापौरांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला वरळीतील कोविड सेंटरचं कंत्राट मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीने हे काम गैरमार्गाने मिळवलेलं आहे. महापालिकेने कोविड सेंटरच्या उभारणीसाठी कुठलीही निविदा प्रक्रिया राबवली नाही. थेट हे काम महापौरांच्या मुलाच्या कंपनीला दिलं. यातच सर्व काही आलं, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता.


संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा