Advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

गेले काही दिवस किशोरी पेडणेकर रुग्णालयांमध्ये भेट देऊन सर्व पाहणी करत होत्या. पण आजा सकाळपासून त्यांना बरे वाटत नसल्यानं त्या रुग्णालयात तपासणीसाठीदाखल झाल्या आहेत...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ताप असल्यानं त्या रुग्णालयात दाखल झाल्या. दोन दिवसांपूर्वीही त्यांची वैद्यकीय चाचणी झाली होती. पण ती नेगेटिव्ह आली होती.

किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. यादरम्यान त्यांनी केईएम, नायर, शताब्दी यासारख्या रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी नर्स म्हणून काम केलं आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला होता. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या नर्सना प्रोत्साहन दिलं. इतकंच नाही तर रुग्ण गायब प्रकरणात त्यांनी गंभीर दखल घेऊन, आवश्यक त्या कारवाईचे आदेश दिले.

किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्यानं, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. सध्या त्यांना ताप आल्याने स्वत:हून उपचारासाठी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. इथं त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांना अॅडमिट केलेलं नाही. केवळ त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती पाहून त्यांना अॅडमिट व्हावं लागेल की नाही याबाबतचा निर्णय सैफी रुग्णालय प्रशासन घेणार आहे.



हेही वाचा

ठाण्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा