Advertisement

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे ११ रुग्ण बरे

कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही. मात्र, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे ११ रुग्ण बरे
SHARES

नायर रुग्णालयात आतापर्यंत ११ कोरोना रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे बरे झाले असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितलं. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता १५ झाली आहे


कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही. मात्र, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. २८ दिवसांनतर कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाईडलाइनुसार ही चाचणी करण्यात येते.  


कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णास टोचला जातो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून रुग्ण बरा होतो. यानुसार पालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू केले आहे. याशिवाय पालिकेच्या शीव, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह, राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे.जे. रुग्णालयातही प्लाझा थेरपीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.


महापालिकेच्या सायन रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपीच्या चाचणीला सुरुवात झाली.   मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलने रक्तदात्यांकडून प्लाझ्मा गोळा केला असून लवकरच या चाचण्या सुरू होणार आहेत. 



हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा