Advertisement

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

दादरमधील शिवाजी पार्क परिसरात शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.

शिवसेना भवनात हे तिन्ही कर्मचारी काम करत आहेत. या तिघांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच, या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर संपूर्ण सेना भवनाचे निजंर्तुकीकरण करण्यात आलं.

शिवसेना भवनातील सर्व कार्यालयं बंद करण्यात आले असून सर्व सामान्यांना सेना भवनात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, १९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत शिवसेना भवनात गेले होते. त्यावेळी हे तिन्ही कर्मचारी तिथे कार्यरत असल्याची माहिती मिळते.

याआधी काही दिवसांपूर्वी देखील शिवसेना भवनात कोरोनानं शिरकाव केला होता. त्याशिवाय, वांद्रे येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळला होता. त्यानंतर या दोन्हा परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलं.

राज्यात रविवारी कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचं निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. घरी आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत.

राज्यात ५ लाख ७० हजार  ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.



हेही वाचा -

Lockdown In Maharashtra: ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

डर के आगे अंडरटेकर था ..!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा