Advertisement

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा


पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा
SHARES
लॉकडाऊनच्या काळात लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेनं सोमवारपासून लोकलच्या ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास आणि कामावार जाण्यास अधिक सोयीचं होणार आहे. तसंच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर जपत प्रवास करता येणार आहे.

'या' मार्गावर धावणार लोकल

चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर २० फेऱ्या, चर्चगेट-विरार जलद मार्गावर १४ फेऱ्या वाढवण्यात येतील. तसेच बोरिवली- वसई रोड धीमा मार्ग, वसई रोड-चर्चगेट जलद मार्ग आणि बोरिवली-विरार धीमा मार्ग या तिन्ही मार्गावर प्रत्येकी २ फेऱ्या वाढवण्यात येतील. यामुळे पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून एकूण २०२ फेऱ्या धावणार आहे, अशी माहिती रविवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागातून देण्यात आली.

मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत सेवा करावी लागत असल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळं अनेकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे १५६ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३०० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी  दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २३ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. 

या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे १३०० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७५ हजार ०४७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात ८२३ कोरोनाचे  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४३ हजार १५४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

Lockdown In Maharashtra: ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

डर के आगे अंडरटेकर था ..!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा