Advertisement

मलबार हिल, नेपियन्सी, पेडर रोड परिसरात कोरोनाची वाढ चिंताजनक

लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर आता मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याचं दिसून येत आहे.

मलबार हिल, नेपियन्सी, पेडर रोड परिसरात कोरोनाची वाढ चिंताजनक
SHARES

लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर आता मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याचं दिसून येत आहे. पालिकेच्या डी वॉर्डमध्ये येणाऱ्या मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीच कँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मागील आठवड्यापासून मोठ्या संख्यने वाढू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक पालिका प्रशासनाकडून शनिवारी बोलावण्यात आली. यावेळी १६० सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, कामगारांसाठी असलेल्या टॉयलेटचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, असे निर्देश देण्यात आले. 

झोपडपट्ट्यानंतर आता कोरोनाचा फैलाव उच्चभ्रू वस्तीमध्ये होऊ लागला आहे. मागील आठवड्यात मलबार हिल येथील नेपीयन्सी रोडवरील ताहनी हाइट्स या इमारतीत  २१ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत.  ताहनी हाइट्स मधील विविध घरांमध्ये घरकाम करणाऱ्या १९ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांमुळे अनेक जणांना संसर्ग झाला असण्याची भिती आहे. 

डी वॉर्डमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना मागील आठवड्यापासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दररोज ३० ते ३५ च्या सरासरीने होणारी रुग्णवाढ आता  सरासरी ५० झाली आहे. विशेष म्हणजे ही वाढ मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीच कँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होत आहे.  त्यामुळे पालिकेसमोर डी वॉर्ड म्हणजेच ग्रँट रोड परिसरात कोरोना रोखण्याचे आव्हान वाढले आहे. डी वॉर्डमध्ये आतार्यंत एकूण २२५९ कोरोना रुग्ण रुग्ण आढळले आहेत. 


हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा