Advertisement

ठाण्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

ठाण्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

१ जुलै ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. लॉकडाऊन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत भाजी तसंच मासळी बाजारही या कालावधीत बंद असतील. ठाणे महापालिका क्षेत्रात कुणालाही ये-जा  करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी असेल.  

निर्बंध थिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे. त्यांच्यावर ठाणे पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणारे, गरज नसताना बाहेर पडणारे यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. गाड्या जप्त देखील केल्या आहेत. सर्व नागरिकांनी घरातच थांबावं, अनावश्यक असताना बाहेर पडू नये अथवा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा अमित काळे यांनी  दिला आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा