Advertisement

महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिलं कोविड सेंटरचं काम, मनसेचा आरोप

स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन महापौरांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिलं कोविड सेंटरचं काम, मनसेचा आरोप
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन महापौरांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दादर इथं पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर हे आरोप केले. याआधीही संदीप देशपांडे यांनी शवपिशव्यांच्या खरेदीत महापालिकेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. (mumbai bmc mayor kishori pednekar involved in covid centres corruption alleges mns leader sandeep deshpande)

आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला वरळीतील कोविड सेंटरचं कंत्राट मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीने हे काम गैरमार्गाने मिळवलेलं आहे. महापालिकेने कोविड सेंटरच्या उभारणीसाठी कुठलीही निविदा प्रक्रिया राबवली नाही. थेट हे काम महापौरांच्या मुलाच्या कंपनीला दिलं. यातच सर्व काही आलं, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

हेही वाचा - तर, संजय राऊत यांच्या पाया पडेन, मनसेच्या ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान

एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना केवळ मुंबई महापालिकेचेच सभागृह बंद आहे.  महापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृह चालू दिलं जात नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली.  

कोरोना संकटाच्या काळात कुणीही राजकारण करु नका, असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असतात. त्यानुसार इतर पक्षही कोरोना संकटाशी लढण्यात व लॉकडाऊनमुळं अडचणीत आलेल्या जनतेला धीर देण्याच्या कामात व्यग्र आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मात्र भ्रष्टाचार करण्यात गुंतली आहे. मात्र  मनसे याप्रकरणी गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उचलणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनीही हा मुद्दा सभागृहात उचलून धरण्याचं आवाहन मनसेने केलं आहे. 

हेही वाचा - पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा