Advertisement

तर, संजय राऊत यांच्या पाया पडेन, मनसेच्या ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान

कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचं काम करून दाखवलं, तर आॅफिसमध्ये येऊन तुमच्या पाया पडेन, असं खुलं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने राऊत यांना दिलं आहे.

तर, संजय राऊत यांच्या पाया पडेन, मनसेच्या ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान
SHARES

बाॅलिवूड अभिनेता आणि सध्या परप्रांतीय मजुरांसाठी मसिहा ठरलेला सोनू सूद याच्यावर टीका करून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काेरोनाच्या संकटाच्या काळात संजय राऊत (coronavirus live updates mns leader sandeep deshpande challenges shiv sena mp sanjay raut to help covid 19 patient like actor sonu sood ) यांनी रुग्णांची मदत केली तर ते देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध होऊ शकतात. कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचं काम करून दाखवलं, तर आॅफिसमध्ये येऊन तुमच्या पाया पडेन, असं खुलं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने राऊत यांना दिलं आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे आव्हान दिलं आहे. राऊतांना आव्हान देणारा एक व्हिडिओच देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर टाकला आहे. यांत ते म्हणतात. कोरोना संकटकाळात सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एक तर आपल्याकडे हव्या त्या प्रमाणात कोरोना चाचणी होत नाहीत. चाचणी झाली, तर अॅम्ब्युलन्स मिळत नाहीत. अॅम्ब्युलन्स मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही. जागा मिळालीच तर सरकारी रुग्णालयातील परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. खासगी रुग्णालयात तर मनमानी बिल आकारत आहेत. अशी ही आपल्याकडील रुग्णायलांची अवस्था आहे. मला असं वाटतं आपण जर ही अवस्था सुधारलीत, तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर या रुग्णांना दिलासा देण्याचं काम केलंत. तर मी स्वत: सामनाच्या कार्यालयात येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलं आहे. 

हेही वाचा - सोनू सूदनं घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

दरम्यान, सामना वृत्तपत्रात लिहिलेल्या आपल्या लेखात संजय राऊत यांनी, कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादं म्हणून वापरलं काय? असा प्रश्न विचारत भाजप आणि सोनू सूद याच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

त्यानंतर रविवारी उशीरा रात्री सोनू सूद याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोनू सूदला भेटून आनंद झाला. COVID 19 या महामारीत लोकांना कशी मदत करता येईल यावर चर्चा झाली. आमच्यात कुठलीही गैरसमजूत नसून सध्या लोकांना दिलेलं वचन पूर्ण करणं हाच हेतू आहे, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर केलं.      

हेही वाचा - भाजपने सोनू सूदला प्यादं म्हणून वापरलं? संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा