राज्यात गुरूवारी १२ हजार २०७ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात मागील काही दिवस दैनंदिन कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी राज्यात १२ हजार २०७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७  झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५६ लाख ८ हजार ७५३ इतका झाला आहे.  राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४५ इतका  आहे.

मुंबईत (mumbai) गुरूवारी ६६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला तसंच ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५६६ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या १५ हजार ८११ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. 

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २५ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ९३ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. गुरूवारी २५ हजार ३९६ चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण ६५ लाख ३४ हजार ९६९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री

पुढील बातमी
इतर बातम्या