Advertisement

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी
SHARES

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस करण्यात आलेली नाही. तसंच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस नाही. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे. दरम्यान यावेळी १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस करण्यता आलेली नाही. कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणं आवश्यक आहे, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाणं आवश्यक आहे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असंही सांगण्यात आलं आहे.

लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य कोरोना केसेसमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या करोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत, असं मार्गदर्शक तत्वात सांगण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा