नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन १२१ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (२४ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १२१ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,३७० झाली आहे. 

मंगळवारी बेलापूर ३६, नेरुळ २४, वाशी २२, तुर्भे १६, कोपरखैरणे ११, घणसोली ७, ऐरोली ३,  दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर २७, नेरुळ १६, वाशी १२, तुर्भे ८, कोपरखैरणे ११, घणसोली ७, ऐरोली १८, दिघामध्ये २ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४,९७३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९६४ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १४३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या