नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन १२२ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२६ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन १२२ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४३,७४८ झाली आहे.

सोमवारी बेलापूर ३८ नेरुळ २१, वाशी १३, तुर्भे ५, कोपरखैरणे १९, घणसोली १५, ऐरोलीमध्ये ११ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५१, नेरुळ ४१, वाशी ३९, तुर्भे २४, कोपरखैरणे ३९,  घणसोली २६, ऐरोली ५१, दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४०,६७९ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८८२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या २१८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 'इतक्या' दिवसांवर


पुढील बातमी
इतर बातम्या