Advertisement

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

केईएम रुग्णालयातील ही चाचणी नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात
SHARES

येत्या सोमवारपासून केईएमच्या स्वयंसेवकांना ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या बहुप्रतीक्षित कोविड लसीच्या चाचणीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयातील ही चाचणी नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्या स्वसंयेवकांचे ४ महिने निरीक्षण केलं जाणार आहे. या अभ्यासाचा संपूर्ण कालावधी सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार असल्याची माहिती केईएम रुगणालयाचे अधिष्ठातांनी दिली.

आतापर्यंत केईएममध्ये १०० जणांना डोस  देण्यात आला असून, स्वयंसेवकंना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरपासून केईएम रुग्णालयात त्याची सुरुवात झाली. चाचण्यांच्या पहिल्या दिवशी २० त ४५ वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्यातील मानवी चाचणीचा भाग म्हणून डोस दिला गेला.

२८ सप्टेंबर या दिवशी नायरमध्ये देखील ३ स्वयंसेवकांना कोविशिल्डची लस देण्यात आली. गेल्या २२ दिवसांत दोन्ही रुग्णालयंयामध्ये १६० हून अधिक स्वयंसेवकाना लसीचा डोस देण्यात आला. केईएम रुग्णालयात आतापर्यंत १०० जणाना, तर नायरमध्ये ६० हून अधिक स्वयंसेवकांना हा रोस देण्यात आला आहे.   


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा