नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन १२४ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १२४ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४४,७९० झाली आहे.

 सोमवारी बेलापूर २४, नेरुळ २८, वाशी ८, तुर्भे २१, कोपरखैरणे १२, घणसोली ९, ऐरोली १६, दिघामध्ये ६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५४ नेरुळ ३७, वाशी १९, तुर्भे १४, कोपरखैरणे २०,  घणसोली १७, ऐरोली ३६, दिघामधील २ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२,२०२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९०८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १६८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडल्यानं पालिकेला दंड

राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘पक्षी सप्ताह’


पुढील बातमी
इतर बातम्या