पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी १५७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (१३ ऑगस्ट) १५७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रूग्णांचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे. परंतु रूग्णांच्या मृत्यूचा अहवाल आज मिळाल्याने आज नोंद केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये कामोठ्यातील ५, नवीन पनवेलमधील २ , खांदा कॉलनीतील २  आणि तळोजा फेज-२ येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

 गुरुवारी तब्बल २८७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील २९, कामोठ्यातील ३०, खांदा कॉलनीतील ९, खारघरमधील ३२, पनवेलमधील ३३, नवीन पनवेलमधील १६, तळोजा येथील ८ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८७७३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७०५१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १५०७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या