पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १७० नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (३१ ऑगस्ट) १७० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेेल, कामोठे आणि कळंबोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश झाला आहे.  १०० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २४,  नवीन पनवेलमधील १८, खांदा कॉलनीतील ९, कळंबोली-रोडपाली येथील ३३, कामोठ्यातील ४३, खारघरमधील ४०,  तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील १५,  नवीन पनवेलमधील १७, कळंबोली-रोडपाली येथील १०, कामोठ्यातील १६, खारघरमधील ३६,  तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ११,८२२ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १०१८३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २८५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३५४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा

'या' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोनावर मोफत उपचार

'या' ५ जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ४०० टक्के


पुढील बातमी
इतर बातम्या