Advertisement

'या' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोनावर मोफत उपचार

सरकारनं कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची मुदतवाढ दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत उपचार होऊ शकतात.

'या' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोनावर मोफत उपचार
SHARES

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे रुग्णांकडून आकारले जात नाहीत. याचा उलट खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेत आहेत. आता तर सरकारनं कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची मुदतवाढ दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत उपचार होऊ शकतात.

आता नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJY) अंतर्गत उपचार घेता येतील. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक MJPJAY अंतर्गत उपचार घेण्यास पात्र आहे. यापूर्वी, राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारला या योजनेचा विस्तार करण्याचं आवाहन केलं होतं.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले. अशात कोरोनासराख्या आजारावरील खर्च देखील अनेकांना परवडणारा नव्हता. त्यामुळे राजेश टोपे यांनी मे महिन्यात घोषणा केली की, राज्यातील सर्व नागरिकांना MJPJY या आरोग्य योजनेत समाविष्ट केलं जाईल.

दरम्यान, महापालिकेनं आठवड्याभरापूर्वी केंद्राच्या नवीन मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर घरगुती क्वारंटाईनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला होता. शहरातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी तयार केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कोरोनव्हायरस ग्रस्त सर्व रूग्णांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक केलं.

दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६ हजार ४०८ रुग्ण सापडले आहेत. या आकड्यांसोबत कोरोनाचे एकूण ७ लाख ८० हजार ६८९ रुग्ण झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ७२.०४ टक्के इतका आहे. जो राष्ट्रीय सरासरीच्या ७६.६१ टक्के इतका आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा