पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १७९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (११ ऑगस्ट) १७९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील एकूण ३२, कामोठ्यातील २९, खांदा कॉलनीतील १४, खारघरमधील ३८, पनवेलमधील १८, नवीन पनवेलमधील १२, तळोजा आर‌एएफ कँप येथील २, तळोजा येथील ६ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८४२७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ६६१९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १६११ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या