कल्याण डोंबिवलीत मंगळवारी १९६ नवे कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे १९६ नवीन रुग्ण आढळले. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता २२,८४९ झाली आहे. यामध्ये ४०६२  रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी 

४५३ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत १८,३२९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यत ४५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन १९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ४८,  कल्याण प.३७,  डोंबिवली पूर्व ५५,  डोंबिवली प २७, मांडा टिटवाळा १३, मोहना येथील  १५ तर पिसवली यथील एका रुग्णाचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, ४ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या