कल्याण डोंबिवलीमध्ये मंगळवारी २०० नवे कोरोना रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे नवीन २०० रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४५६ जणांना गेल्या २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवीन २०० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३२,  कल्याण पश्चिम ३६,  डोंबिवली पूर्व ६८, डोंबिवली पश्चिम ४१, मांडा टिटवाळा २१, मोहना १, तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ३ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, १६ रुग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून, १५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २४,८७० झाली आहे. यामध्ये ३२३७ रुग्ण उपचार घेत असून २१,०९२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ५११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा -

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे


पुढील बातमी
इतर बातम्या