Advertisement

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ठोस पुरावे द्या आणि मगच आरोप करा, असं खुलं आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान
SHARES

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी हवेत आरोप करू नका. हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ठोस पुरावे द्या आणि मगच आरोप करा, असं खुलं आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत भाजपला उद्देशून म्हणाले, कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये. हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे घेऊन पुढं या आणि त्यांचं नाव घेऊन आरोप करा. आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील युवा नेतृत्व आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून ते चांगलं काम करत आहेत. त्यांचं हे काम अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना केवळ राजकारण करून त्यांची बदनामी करण्याची मोहीम सुरु आहे. हे चांगल्या संस्कृतीचं राजकारण नाही. अशा तऱ्हेने कुठल्याही पक्षातील युवा नेत्यांचं खच्चीकरण केलं जाऊ नये, यामुळे कुणाचाही फायदा होणार नसून केवळ महाराष्ट्राचं नुकसानच होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा- आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

कोणी कितीही दावा केला तरी सुशांत सिंह राजपूत मुंबईचा मुलगा आहे. त्याला न्याय देण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचं आहे. मुंबई पोलीस आणि सरकारचं ते दायित्व आहे. मुंबई पोलीस सुशांत प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र पहिल्या दिवसांपासून तपासात अडथळे आणले जात आहेत. खोटी माहिती जोडली जात आहे. तपासात चूक होत असेल तर सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण बिहारमधील राजकारणासाठी तुम्ही बिहार पोलिसांकडे तपास देता आणि ते मुंबईत येतात हे चुकीचं आहे. याप्रकरणी ईडी चौकशी करत असेल, तर करू देत, कायदा आम्हालाही ठाऊक आहे. कायदा तयार होतो तेव्हा आम्हीही संसदेत असतो. कायदा कसा मोडला जातो हेदेखील आम्ही पाहिलं आहे. ज्यांना जो तपास करायचा आहे तो करु देत. सत्य समोर आलं पाहिजे, असं आमचंही म्हणणं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा