धारावीत दिवसात आढळले २१ रुग्ण, ६ ऑक्टोबरच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण

G-उत्तर प्रभागांतर्गत येणाऱ्या धारावीतील COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी, १६ मार्च रोजी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये COVID 19 मधील २१ नवीन रुग्णांची नोंद केली. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची आकडेवारीा ४ हजार २७९ वर गेली.  

ही दिवसातील सर्वाधिक कोरोना वाढ आहे. गेल्यावर्षी ६ ऑक्टोबरला धारावीत २२ कोरोना रुग्ण आढळली होती. त्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

जानेवारीमध्ये धारावीवर ‘शून्य’ कोविड -१९ रुग्ण नोंदवली गेली. त्यानंतर २ फेब्रुवारीपर्यंत धारावीत एकच कोरोना रुग्ण आढळला. याव्यतिरिक्त, गेल्या वर्षी डिसेंबरपासून, जी-उत्तर वॉर्डमध्ये बहुतेक दिवसांत एकच रुग्ण नोंदविला जात होता.

गेल्या आठवड्यात या प्रभागातून ९  मार्च ते १५ मार्च दरम्यान एकूण ३२९ रुग्ण नोंदवली गेली. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या आकडेवारीनुसार जी-उत्तर प्रभागात चार सीलबंद इमारती आणि एक कंटेन्ट झोन आहे.


हेही वाचा

कोरोना लसीची निर्मिती मुंबईत 'इथं' होणार

३०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाचा उडाला बार, पालिकेच्या कारवाईनं वाजला बँड

पुढील बातमी
इतर बातम्या