Advertisement

चेंबूर, वांद्र्यातील कोरोनाची आकडेवारी सप्टेंबर-ऑक्टोबरपेक्षा खराब

चेंबूर आणि वांद्रे या भागात सप्टेंबर-ऑक्टोबरच्यया तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

चेंबूर, वांद्र्यातील कोरोनाची आकडेवारी सप्टेंबर-ऑक्टोबरपेक्षा खराब
SHARES

चेंबूर आणि वांद्रे या भागात सप्टेंबर-ऑक्टोबरच्यया तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोविड १९ मधील मृत्यूच्या आकडेवारीत त्या तुलनेनं वाढ झाली नाही.

M West आणि H West नगरपालिका प्रभागातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोकांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे, मास्क नीट न घातल्यामुळे आणि सामाजिक अंतर न पाळल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

सप्टेंबरमध्ये चेंबूर आणि टिळक नगरचा भाग असलेल्या M West प्रभागात दिवसाला ८५ रुग्ण नोंदवली गेली. गेल्या महिन्यात, काही दिवसांवरील दैनंदिन संख्या ९४ रुग्णांवर पोहोचली आहे.

दुसरीकडे, मंगळवारी, १६ मार्च रोजी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे १७ हजार ८६४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा आकडा २३ लाख ४७ हजार ३२८ वर गेला आहे. सध्या राज्यात १ लाख ३८ हजार ८१३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

शिवाय, गेल्या २४ तासांत राज्यातील ८७ जणांनी COVID 19 मध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. ६ लाख, ५२ हजार ५३१ नागरिक होम क्वारंटाईनमध्येआहेत. तर इतर ६ हजार ०६७ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं आहे. राज्यात कोविड रिकवरी रेट आणि मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे १.७७ टक्के आणि २.२६ टक्के आहे. याव्यतिरिक्त, मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनव्हायरसची १ हजार ९२२ ताजी प्रकरणं नोंदवली गेली.



हेही वाचा

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये कोविडचा आकडा सर्वाधिक

दुसरी कोरोना लस घेतल्यानंतरही ८ आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा