Advertisement

रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर अ‍ॅन्टीजन किट वापरा, केंद्राचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

राज्यानं किटचा वापर विशेषतः कंन्टेंमेंट झोन आणि सुपर-स्प्रेडर इव्हेंट्स, बस स्टॉप्स, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी करावा...

रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर अ‍ॅन्टीजन किट वापरा, केंद्राचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
(Representational Image)
SHARES

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्रात चिंता निर्माण झाली आहे. कारण कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्लाच बसला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

अहवालानुसार, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ५६ टक्के रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी फक्त ७ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.

सर्वाधिक प्रकरणे असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक, औरंगाबाद हे ८ जिल्हे आहेत. प्रकरणातील मृत्यूचे प्रमाणही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास एक टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, हॉटस्पॉट्स म्हणून उदयास येत असलेल्या भागात लसीकरण अधिक तीव्र केले पाहिजे किंवा लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. चाचणी सकारात्मकतेचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी पातळीवर आणण्यासाठी चाचणी वाढवणं आवश्यक आहे.

आरटी-पीसीआर चाचणीचा मुख्य आधार आहे. आयसीएमआर मार्गदर्शनानुसार राज्यानं किटचा वापर विशेषतः कंन्टेंमेंट झोन आणि सुपर-स्प्रेडर इव्हेंट्स, बस स्टॉप्स, रेल्वे स्थानक, झोपडपट्ट्या, दाट लोकवस्ती इत्यादीसारख्या उच्च जोखीम सेटिंग्समध्ये केला पाहिजे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी या सूचना आपल्या पत्रात नमूद केल्या आहेत.

त्यांनी असंही सांगितलं की, १२ मार्च २०२१ पर्यंत कोरोनाव्हायरस लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून फक्त २३.९ लाख लसीकरण डोस देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य देणं ही काळाची गरज आहे.



हेही वाचा

मुंबईची लॉकडाऊच्या दिशेनं वाटचाल; १९२२ जणांना कोरोनाची लागण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा