Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये कोविडचा आकडा सर्वाधिक

भारतात गेल्या २४ तासांत ७७ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्राचे आहेत.

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये कोविडचा आकडा सर्वाधिक
(Representational Image)
SHARES

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी,१६ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत ७७ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यानंतर पंजाब आणि हरियाणाचा नंबर लागतो.

महाराष्ट्रात, पुणे, नागपूर, मुंबई या जिल्ह्यांत प्रत्येकी १२,००० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह कोरोनाव्हायरस रुग्ण आढळून आली आहेत. मंगळवार, १६ मार्च रोजीची एकूण संख्या २.२ लाखांवर गेली.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १.५ लाखांपेक्षा कमी होता. आरोग्य मंत्रालयानं पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येची जिल्हावारी आकडेवारी दिली आहे.

महाराष्ट्रात २४ हजार ४६८ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नागपूर (१८ हजार ११४), मुंबई (१३ हजार ३०९), ठाणे (१२ हजार ६८०) आणि नाशिक (८ हजार ०३५) आहे. जवळपास ५९ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ११ मार्चच्या आकडेवारीनुसार पुण्यात १८ हजार ४७४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर मुंबईत ९ हजार ९७३ आणि नागपुरात १२ हजार ७२४ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोविडच्या पॉझिटिव्ह घटनांमध्ये अल्प कालावधीत तीव्र वाढ दर्शविली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये गेल्या काही आठवड्यांत कोविडचा प्रादुर्भाव वाढला आहे. म्हणून पंजाब नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. दररोज १ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण नोंदवले जात आहे. तर, भारतातील सक्रीय प्रकरणात राज्याचे योगदान ५.३४ टक्के आहे. तर सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्हे जालंधर (१ हजार ५८५), एसएएस नगर (१ हजार ३३८), होशियारपूर (१ हजार ३०१), पटियाला (१ हजार २०१) आणि एसबीएस नगर (१ हजार १७३) आहेत.हेही वाचा

दुसरी कोरोना लस घेतल्यानंतरही ८ आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर अ‍ॅन्टीजन किट वापरा, केंद्राचे महाराष्ट्र सरकारला आव्हान

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा