Advertisement

कोरोनामुळं माथेरानच्या मिनी ट्रेनला पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेल्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद ओसरला आहे.

कोरोनामुळं माथेरानच्या मिनी ट्रेनला पर्यटकांचा अल्प प्रतिसाद
SHARES

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक माथेरानला जातात. माथेरानमधील मिनी ट्रेन ही पर्यटकांना आकर्षित करते. परंतु, नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेल्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद ओसरला आहे.

जानेवारीमध्ये ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. आता मार्च महिन्यात हीच संख्या ११५०० पर्यंत आली आहे. लॉकडाऊनच्या काळात माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंदच होती. लॉकडाऊन शिथिल होताच शहरानजीकच्या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पावले वळू लागली. माथेरानलाही पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला.

बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू झाली.

या गाडीच्या दररोज १२ फेऱ्या होतात. ही सेवा सुरू होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. परंतु करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांचा प्रतिसाद ओसरू लागल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं आणि काहीसा उकाडाही वाढल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत असल्याचं दिसत आहे. एप्रिल, मे महिन्यात सुट्ट्या सुरू झाल्यावर प्रतिसाद  काहिसा वाढू शकेल अशी आशा आहे, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मिनी ट्रेन

  • नेरळ ते माथेरान मिनी टेनमधून नोव्हेंबर २०२० ते १५ मार्च २०२१ पर्यंत एकूण १ लाख १० हजार ७०२ प्रवाशांनी प्रवास केला. 
  • ६७ लाख रुपये महसूल रेल्वेला मिळाला.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १६ हजार ९४६ जणांनी प्रवास केला होता.
  • जानेवारी २०२१ मध्ये हीच संख्या ३३ हजार ५१५ पर्यंत पोहोचली.
  • फेब्रुवारी २० हजार ५४८ आणि आता मार्चमध्ये ११ हजार ५०७ प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.



हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा