पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २२३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (४ सप्टेंबर) २२३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेल, खांदा कॉलनी आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश झाला आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४५,  नवीन पनवेलमधील १८, खांदा कॉलनीतील २१, कळंबोली-रोडपाली येथील ४१, कामोठ्यातील ५६, खारघरमधील ३६,  तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ३४,  नवीन पनवेलमधील ४५, कळंबोली-रोडपाली येथील २१, कामोठ्यातील ३५, खारघरमधील ५३,  तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १२६९८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १०८९९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४९५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

राज्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर


पुढील बातमी
इतर बातम्या