Advertisement

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५० हजारांच्यावर गेली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कोरोनाविरोधात निकराचा लढा देत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र, राज्यातील इतर शहरांमध्ये रुग्ण वाढतच आहेत. महाराष्ट्रातील चार विभागांमधील कोरोना रुग्णांची संख्याएक लाखापेक्षा अधिक झाली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५० हजारांच्यावर गेली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.  उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांनी आता ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. येथील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. उल्हासनगरमध्ये गुरुवारी ७३ नवीन रुग्ण आढळले. येथील मृतांची संख्या २९१ वर गेली आहे.

ठाणे विभागात (मुंबई वगळता) आतापर्यंत एकूण १,९६,२७३  रुग्ण आढळले आहेत. 

पालिका क्षेत्र     रुग्णसंख्या       मृत्यू

ठाणे शहर          २०,४६३        ५३३

टीएमसी            २७,६२९        ९८६

नवी मुंबई           २९,८०२       ६६४

कल्याण डोंबिवली    ३३,२८१       ६६४ 

उल्हासनगर          ८०४९         २९१

भिवंडी निजामपूर     ४५६५         ३१४

मीरा भाईंदर          १३,४५५       ४३९

पालघर               ८९२५         १५३

वसई विरार          १७,८४४        ४६८

रायगड               १८,६६३        ५१७

पनवेल               १३,५९७        २९६


गुरुवारपर्यंत राज्यात २,०५,४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी मुंबईत २१,४३९  आणि ठाण्यात २१,१२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ६ लाख रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ७२. ५८ टक्के आहे.


हेही वाचा -

मुंबईत १५२६ नवे रुग्ण, ३७ जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्यात १८ हजार १०५ नवे रुग्ण, ३९१ जणांचा दिवसभरात मृत्यू


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा