Advertisement

मुंबईत १५२६ नवे रुग्ण, ३७ जणांचा दिवसभरात मृत्यू

गुरूवारी दिवसभरात ८५९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २० हजार ५६१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत १५२६ नवे रुग्ण, ३७ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोने ३९१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात १५२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३७ रुग्ण दगावले आहेत. तर १ आॅगस्ट रोजी ३५ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३ आॅगस्ट रोजी एकूण ३४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १५२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ५० हजार ०९५ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ८५९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २० हजार ५६१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-सरकारला  मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

राज्यात आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. आज १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०५  हजार ४२८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२९ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १८,१०५ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१५२६ (३७), ठाणे- २७१ (३), ठाणे मनपा-३४८ (११), नवी  मुंबई मनपा-३५९ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३९४ (१), उल्हासनगर मनपा-७३, भिवंडी निजामपूर मनपा-२०, मीरा भाईंदर मनपा-१७५ (३), पालघर-१४३ (१), वसई-विरार मनपा-२०७ (९), रायगड-४२८ (४), पनवेल मनपा-२८६ (१), नाशिक-१६६ (८), नाशिक मनपा-७०८ (६), मालेगाव मनपा-२४ (१), अहमदनगर-४७३ (३),अहमदनगर मनपा-२६५ (३), धुळे-३०१ (१), धुळे मनपा-२२६ (२), जळगाव- ४१६ (१४), जळगाव मनपा-१०० (२), नंदूरबार-८५ (४), पुणे- १०५८ (२३), पुणे मनपा-१८७३ (४७), पिंपरी चिंचवड मनपा-९७९ (८), सोलापूर-४६५ (११), सोलापूर मनपा-७६ (४), सातारा-६७० (२५), कोल्हापूर-३२७ (२५), कोल्हापूर मनपा-१४१ (५), सांगली-४६३ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३८२ (७), सिंधुदूर्ग-८३, रत्नागिरी-१३५ (३), औरंगाबाद-१००,औरंगाबाद मनपा-१८६ (३), जालना-९७ (४), हिंगोली-३३ (३), परभणी-६६ (३), परभणी मनपा-५० (२), लातूर-२०२ (६), लातूर मनपा-७० (२), उस्मानाबाद-२९० (९), बीड-१०० (४), नांदेड-१७६ (४), नांदेड मनपा-१२२ (१), अकोला-१९ (१), अकोला मनपा-५५ (३), अमरावती- ३३ (१), अमरावती मनपा-१८५, यवतमाळ-१७४ (२), बुलढाणा-१७५ (६), वाशिम-६४ (१), नागपूर-२७१ (१), नागपूर मनपा-१३४९ (३०), वर्धा-११०, भंडारा-१३, गोंदिया-१७५, चंद्रपूर-१२३, चंद्रपूर मनपा-८१, गडचिरोली-२१, इतर राज्य- १९ (३).

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा