पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी(२२ जानेवारी) २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३,  नवीन पनवेल २, खांदा काॅलनी १, कळंबोली १, कामोठे ८, खारघर  येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १८, कळंबोली २,  कामोठे १३, खारघर येथील १८ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८४७६ कोरोना रूग्णांपैकी २७५१३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१९ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३४४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

मध्य रेल्वे सुरू करणार 'डिजीलॉकर' सुविधा

लसीकरणानंतर मद्यपान न करण्याचा सल्ला, डॉक्टरांमध्ये संभ्रम


पुढील बातमी
इतर बातम्या