Advertisement

मध्य रेल्वे सुरू करणार 'डिजीलॉकर' सुविधा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मध्य रेल्वे सुरू करणार 'डिजीलॉकर' सुविधा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' यानुसार या डिजीलॉकरचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.

सामान ठेवण्यासाठी किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सर्वप्रथम लॉकर निवडणे आवश्यक आहे. सामान ठेवल्यानंतर संबंधित प्रवाशांना एक बारकोड असलेली पावती देण्यात येईल. सामान पुन्हा मिळवण्यासाठी डिजीलॉकरवरील स्कॅनरवर ही पावती स्कॅन केल्यास योग्य लॉकर खुले होईल.

ऑनलाइन शुल्क भरण्यासह पावतीही ऑनलाइन उपलब्ध करण्यात येईल. यामुळे प्रवाशांची पावती गहाळ होण्याची चिंता दूर होणार आहे.

ही सेवा सशुल्क असणार आहे. नॉन फेअर रिवेन्यू मॉडेलनुसार ही सुविधा रेल्वे स्थानकात सुरू करण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा