नवी मुंबईत सोमवारी २३३ नव्या रुग्णांची भर

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे २३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील कोरोना रुग्णांची संख्या आता ९६७८ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नवी मुंबईतील ३०५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी मुंबईत गेल्या ४ दिवसांमध्ये ११६० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवी मुंबईमध्ये १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ३५, नेरुळ ३९, वाशी २०, तुर्भे १५, कोपरखैरणे ३४, घणसोली २७, ऐरोली ४७, दिघा १६ रुग्ण येथील रुग्णांचा समावेश आहे.

समाधानाची बाब म्हणजे सोमवारी १५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर १३, नेरुळ २४, वाशी १२, तुर्भे १९, कोपरखैरणे १६, घणसोली ३३, ऐरोली २४, दिघा ११ असे एकूण १५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८०४ वर पोहोचली आहे तर नवी मुंबईत सध्या ३५६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा -

Sealed Building List Mumbai : मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!


पुढील बातमी
इतर बातम्या