थोडा दिलासा, राज्यात सोमवारी कोरोनाचे २४ हजार ६४५ नवे रुग्ण

नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत राज्याला थोडाफार दिलासा मिळाला आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे नवीन २४ हजार ६४५ रुग्ण आढळले. मागील काही दिवसांपासून रोज रुग्णसंख्या वाढतच होती. रविवारी ३० हजार रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या घटली आहे. 

सोमवारी ५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १९ हजार ४६३ रुग्ण बरे  झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. आतापर्यंत एकूण २२,३४,३३०   रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.२२  टक्के झाले आहे.

 राज्यात सध्या २,१५,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३९ हजार ४९२ ॲक्टिव्ह  रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो ३१ हजार ४२९ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २३ हजार ६७१ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या २० हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत



हेही वाचा -

  1. २४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन
  2. धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले

पुढील बातमी
इतर बातम्या