नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५४ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५४ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ९६६ झाली आहे.  

मंगळवारी बेलापूर १९, नेरुळ ६१, वाशी ३५, तुर्भे १४, कोपरखैरणे ४३, घणसोली ३१, ऐरोली ४८, दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवी मुंबईत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसंच पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रार्दुभाव संपेपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सातही दिवस कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

दिवसभरात २०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी बेलापूर १८, नेरुळ १९, वाशी २३, तुर्भे ३८, कोपरखैरणे ४४, घणसोली ८३, ऐरोली ७३, दिघामध्ये ३ नवे रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७१८ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ३८९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी


पुढील बातमी
इतर बातम्या