नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन २७४ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (१० आॅगस्ट) कोरोनाचे नवीन २७४ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १८ हजार ७५५  झाली आहे.

सोमवारी बेलापूर ५३, नेरुळ ४५, वाशी २५, तुर्भे २२, कोपरखैरणे ५२, घणसोली ४४, ऐरोली २६, दिघामध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ५२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर १११, नेरुळ ८७, वाशी ५४, तुर्भे २५, कोपरखैरणे ५५, घणसोली ८६, ऐरोली १०० आणि दिघामधील १० रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४८१४ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ४७४ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नवी मुंबईत कोरोनाची लागण मोठ्या व्यक्तीबरोबरच लहान मुलांना देखील होत असल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत नवी मुंबईतील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १३,१८३ इतकी असल्याचे तसेच त्यातील ६ ते १६ वयोगटातील ८१७ शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.


हेही वाचा

धारावी नियंत्रणात, दादर, माहीममध्ये रुग्णवाढ कायम

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर


पुढील बातमी
इतर बातम्या