कल्याण डोंबिवलीत नवीन २८० कोरोना रुग्णांची नोंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी नवीन २८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ४०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,०६४ झाली आहे. यामध्ये ३४४४ रुग्ण उपचार घेत असून ३९,७६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६४, कल्याण प ६५, डोंबिवली पूर्व ८८, डोंबिवली प ४८, मांडा टिटवाळा  ९, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ११ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यास…

Coronavirus Updates: कोरोनाच्या उपाययोजनांवरील खर्चात ५० टक्के कपात करण्याच्या सूचना


पुढील बातमी
इतर बातम्या