नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २८२ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन २८२ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २६,४३१ झाली आहे.

मंगळवारी  बेलापूर ४३, नेरुळ ५३, वाशी ५६, तुर्भे ३८, कोपरखैरणे ३३, घणसोली ४५, ऐरोली ११, दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४८, नेरुळ ५२, वाशी ३४, तुर्भे ३०, कोपरखैरणे ३५,  घणसोली ३०, ऐरोली ८ आणि दिघामधील ५ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२३५० पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५९५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने पालिका प्रशासनाने रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवली आहे. ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

वाशी येथील फोर्टिज हिरानंदानी या रुग्णालयाने चाळीस खाटांचे केंद्र उभे केले आहे. फोर्टिज रुग्णालयाबरोबर पालिकेने एमजीएमचे सानपाडा येथील नियोजित रुग्णालय ताब्यात घेतेल असून त्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा होईल अशा यंत्रणा उभी केली आहे.


हेही वाचा

माहिम आणि दादरमध्ये पालिकेद्वारे मोफत कोरोना अँटिजेन चाचणी

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या घटून ५५४ वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन


पुढील बातमी
इतर बातम्या